Ad will apear here
Next
‘सॅमसंग’ नेमणार एक हजार अभियंते
पुणे : सॅमसंग इंडिया आपल्या संशोधन आणि विकास केंद्रांसाठी २०१८मध्ये आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी सारख्या सर्वोत्तम महाविद्यालयातून एक हजार अभियंते निवडणार आहे. निवडलेल्या अभियंतांपैकी बहुतांश उमेदवार आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्झ (आयओटी), मशीन लर्निंग, बायोमेट्रिक, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग, ऑग्मेंटेड रियालिटी आणि फाइव्ह-जी सारखे नेटवर्क यांसारख्या आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानावर काम करतील.

आयआयटी आणि एनआयटी व्यतिरिक्त दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, बिट्स पिलानी, मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी आणि आयआयआयटी या आणि इतर प्रमुख महाविद्यालयांतूनही ‘सॅमसंग’ गुणवंत आणि प्रतिभावंत उमेदवार निवडणार आहे. मागच्या वर्षी ‘सॅमसंग’ने आपल्या संशोधन आणि विकास केंद्रासाठी ८००  अभियंता निवडले होते आणि त्यापैकी ३०० उमेदवार आयआयटीमधील विद्यार्थी होते. यावर्षीही ‘सॅमसंग’ आयआयटीमधून ३०० अभियंता निवडून त्यांना विविध क्षेत्रात काम देणार आहे.

जगभरात ‘सॅमसंग’ची ३२, तर भारतात तीन संशोधन आणि विकास केंद्रे आणि दोन निर्मिती केंद्रे आहेत. संशोधन आणि विकास केंद्रे बेंगळुरू, नोयडा आणि दिल्ली इथे आहेत. दक्षिण कोरिया वगळता सॅमसंगचे सगळ्यात मोठे संशोधन आणि विकास केंद्र बेंगळुरुमध्ये आहे. भारतातील संशोधन आणि विकास केंद्रात जगभरातील उत्पादनांसाठी संशोधन केले जाते आणि त्याच बरोबर भारतातील स्थानिक बाजारासाठी पण विशिष्ट संशोधन केले जाते.

कंपनीच्या संशोधन केंद्रांमध्ये विकसित झालेल्या अनेक ‘मेड इन इंडिया’ कल्पना, जसे एस-बाइक मोड, अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड, वॉशिंग मशीनसाठी अॅक्टिववॉश प्लस आदी आज भारतात आणि इतर काही विकसनशील देशात विकल्या जाणार्‍या सॅमसंग उत्पादनांचा एक भाग आहेत. यापैकी काही नवीन शोध ‘सॅमसंग’च्या जागतिक उत्पादनांचाही भाग झाले आहेत.

याबाबत सॅमसंग भारतीय आर अँड डी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष दीपेश शाह म्हणाले, ‘भारतात होणार्‍या संशोधन आणि विकासाकडून ‘सॅमसंग’च्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. आम्ही २२ वर्षांपासून भारतात आहोत. भारतातील तीन संशोधन आणि विकास केंद्रात अद्ययावत संशोधन केले जाते. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत, भारतातील संशोधन आणि विकास केंद्रात भारतीय ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून नवीन कल्पनांचा विचार केला जात आहे आणि त्याचा उपयोग जगभरातील सॅमसंग उत्पादनात पण केला जातो.’

ते पुढे म्हणाले, ‘यावर्षी सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातून आमच्या तीन संशोधन आणि विकास केंद्रांसाठी आम्ही एक हजार अभियंता निवडणार आहोत, ज्यापैकी ३०० आयआयटी मधील असतील. बहुतांश अभियंता आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, सिग्नल प्रोसेसिंग, कम्प्युटर विझन, मोबाइल सुरक्षा, बायोमेट्रिक्स आदींसारख्या क्षेत्रात काम करतील. तिथे प्रतिभा आणि कौशल्याची खूप आवश्यकता आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZYYBL
Similar Posts
‘सॅमसंग इंडिया’तर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी मदत नवी दिल्ली : केरळ येथे नुकत्याच आलेल्या पुराचा फटका बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी सॅमसंग इंडियाने मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्तांसाठी ग्राहक सेवा व्हॅन्स तैनात करण्यात आल्या असून, रिलिफ कॅम्पही उभारले जाणार आहेत. कंपनीची तीन केंद्रे आणि दोन कारखान्यातील कर्मचारीही केरळमधील लोकांसाठी योगदान देणार आहेत
‘सॅमसंग’तर्फे डिजिटल कॅम्पेन नवी दिल्ली : सॅमसंग इंडियाने आपल्या डिजिटल व्हॉइट असिस्टंट बिक्सबीची क्षमता दर्शवण्यासाठी डिजिटल कॅम्पेन सादर केले आहे. एका हृदयस्पर्शी सादरीकरणाद्वारे बिक्सबीची क्षमता प्रेक्षकांसमोर येते आणि थेट हृदयाला भिडते. ही फिल्म मोटर न्यूरॉन डिसीज (एमएनडी)/एएलएस रुग्ण असलेल्या सोनलची (नाव बदललेले आहे) आहे, ज्यांनी
‘गुंतवणूकदार हेच महाराष्ट्राचे ॲम्बॅसिडर’ पुणे : ‘उद्योगपूरक धोरण राबविल्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आम्ही केवळ शासक नसून गुंतवणुकीदांरांचे भागीदार म्हणून काम करीत आहोत. गुंतवणूकदारांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असून, गुंतवणूकदार हेच महाराष्ट्राचे खरे ॲम्बॅसिडर आहेत,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
भारतातील सिनेमा थिएटरला नवा आयाम नवी दिल्ली : ग्राहकांना नाविन्यपूर्ण व सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सॅमसंग इंडिया या देशातील सर्वात विश्वासार्ह कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने जगातील पहिला ऑनिक्स सिनेमा एलईडी स्क्रीन भारतात आणून सिनेमा पाहण्याच्या पद्धतीला नवा आयाम दिला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language